
मकरंद विपट
अल्ट्राटेक सिमेंट प्रामुख्याने जगभरात सिमेंट आणि सिमेंटशी संबंधित उत्पादननिर्मिती आणि विक्री करते. ही कंपनी चीन वगळता जगातील तिसरी सर्वांत मोठी सिमेंट कंपनी आहे. ग्रे सिमेंट क्षमतेत २२ टक्के वाटा असलेली ही भारतातील सर्वांत मोठी सिमेंट उत्पादक कंपनीदेखील आहे. ही कंपनी देशातील एक आघाडीची रेडी-मिक्स काँक्रिट प्रदाता आहे, जी २७ विशेष काँक्रिटमध्ये कस्टमाइज्ड सोल्युशन्स ऑफर करते. तिच्या उपकंपनीद्वारे संयुक्त अरब अमिराती, बहारीन आणि श्रीलंकेत सिमेंट निर्यात केली जाते.