
Stock Market Open on Saturday 1 February 2025: शनिवारी 1 फेब्रुवारी 2025 रोजी शेअर बाजारात व्यवहार होणार आहेत. हा दिवस जरी शनिवार असला तरी स्टॉक एक्स्चेंजमध्ये सकाळी 9 ते दुपारी 3:30 पर्यंत व्यवहार करता येणार आहेत.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन शनिवारी 1 फेब्रुवारी 2025 रोजी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) शनिवारी, 1 फेब्रुवारी 2025 रोजी अर्थसंकल्पामुळे सुरु राहणार आहेत.