

us-war-impact-gold-silver-price-investor-alert
esakal
International War Economic Impact : नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच जागतिक बाजारात प्रचंड अस्थिरता पाहायला मिळत असून त्याचा थेट परिणाम सोने व चांदीच्या दरांवर होत आहे. अमेरिकन डॉलर निर्देशांक ९८.५ च्या आसपास स्थिर असतानाच अमेरिकी शेअर बाजारात किरकोळ वाढ झाली आहे. मात्र गेल्या आठवड्यात शेअर बाजार कोसळलेला असतानाही अमेरिकन डॉलर अधिक मजबूत झाल्याचे पहायला मिळालं.