Vodafone Idea FPO: व्होडाफोन आयडियाचा एफपीओ १८ एप्रिलला होणार खुला; काय आहे किंमत?

Vodafone Idea FPO: व्होडाफोन आयडियाचा अठरा हजार कोटी रुपयांचा एफपीओ इशू ( फॉलोऑन पब्लिक ऑफर ) १८ ते २२ एप्रिल दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला होत आहे. त्यासाठी दहा ते अकरा रुपये किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे.
Vodafone Idea FPO Price band, lot size and other key details about 18,000-crore issue
Vodafone Idea FPO Price band, lot size and other key details about 18,000-crore issue Sakal

मुंबई, ता. १६ : व्होडाफोन आयडियाचा अठरा हजार कोटी रुपयांचा एफपीओ इशू ( फॉलोऑन पब्लिक ऑफर ) १८ ते २२ एप्रिल दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला होत आहे. त्यासाठी दहा ते अकरा रुपये किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे.

एखाद्या नोंदणीकृत कंपनीने पुन्हा आपल्या शेअरचा इशू बाजारात आणला तर त्याला एफ पी ओ म्हणतात. व्होडाफोन आयडियाचे सीईओ अक्षय मुंद्रा यांनी आज येथे पत्रकारांना ही माहिती दिली. या रकमेतून १२,७५० कोटी रुपये खर्च करून सध्याच्या नेटवर्क सुविधांचा विस्तार केला जाईल. तसेच फोरजीचे नवे नेटवर्क उभारले जाईल आणि सध्याच्या फोर-जी नेटवर्कची क्षमता वाढवली जाईल, तसेच फाईव्ह जी नेटवर्कही उभारले जाईल. तसेच या रकमेतून २,१७५ कोटी रुपयांचे स्पेक्ट्रम साठीचे शिल्लक राहिलेले पैसेही दिले जातील.

Vodafone Idea FPO Price band, lot size and other key details about 18,000-crore issue
Tesla Layoff: इलॉन मस्कचा धक्कादायक निर्णय! हजारो कर्मचाऱ्यांना दाखवणार बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?

येत्या दोन ते तीन वर्षात फाईव्हजी मधील ४० टक्के महसूल आम्हाला मिळेल. मोठ्या शहरांमध्ये फाइव्हजी नेटवर्क उभारण्यावर भर दिला जाईल, असेही ते म्हणाले. सध्या ग्रोथ इंडिया स्टोरीची भरपूर चर्चा आहे, त्याचप्रमाणे ग्रेट इंडिया टेलिकॉम स्टोरीची देखील चर्चा आहे. देशाची लोकसंख्या वाढत असून अद्यापही सर्वांना मोबाईल मिळाला नाही.

Vodafone Idea FPO Price band, lot size and other key details about 18,000-crore issue
D Subbarao: तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था झाल्यानंतरही भारत गरीबच राहणार; असं का म्हणाले RBIचे माजी गव्हर्नर?

तसेच भविष्यात मोबाईलचे व इंटरनेटचे दरही वाढत जातील. त्यामुळे हे क्षेत्र सतत वाढत जाणार आहे. या एफपीओमुळे मिळणाऱ्या निधीतून आमची वाढ होईल. सरकार हा आमचा मोठा भागीदार असल्यामुळेही आमची बाजू बळकट आहे, असेही अक्षय मुंद्रा म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com