Stock Market CrashSakal
Share Market
Stock Market Crash: गुंतवणूकदारांचे काही मिनिटांतच 5 लाख कोटींचे नुकसान; आज सेन्सेक्स, निफ्टी का घसरत आहेत?
Stock Market Updates: आज भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतातून येणाऱ्या वस्तूंवर 1 ऑगस्टपासून 25 टक्के टॅरिफ लावण्याची धमकी दिल्यानंतर सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये पडझड झाली.
Summary
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतातून होणाऱ्या आयातींवर 25% टॅरिफ लावण्याची धमकी दिली.
त्यामुळे भारतीय बाजारात मोठी विक्री झाली. या घोषणेने गुंतवणूकदारांचा विश्वास डळमळीत झाला.
अवघ्या काही मिनिटांत BSE लिस्टेड कंपन्यांचे एकूण मार्केट कॅप 5.5 लाख कोटींनी घसरले.
Stock Market Updates: आज भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतातून येणाऱ्या वस्तूंवर 1 ऑगस्टपासून 25 टक्के टॅरिफ लावण्याची धमकी दिल्यानंतर सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये पडझड झाली. यामुळे काही मिनिटांतच गुंतवणूकदारांचे तब्बल 5.5 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले.