
Operation Sindoor Stock Market: आज बुधवारी सकाळी, भारतीय शेअर बाजारात सुरुवातीला घसरण झाली. निफ्टी 50 निर्देशांक 24,300च्या खाली गेला आणि सेन्सेक्समध्येही 200 अंकांची घसरण झाली. या घसरणीचे मुख्य कारण म्हणजे भारताने पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर केलेले 'ऑपरेशन सिंदूर' हे आहे.
पण सुरुवातीला घसरण झाली असली तरी शेअर बाजार लवकरच सावरला. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FII) मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक सुरू ठेवली, ज्यामुळे बाजाराला आधार मिळाला.