
थोडक्यात:
जगात अनेक देश असे आहेत जिथे नागरिकांना त्यांच्या कमाईवर एक रुपयाचाही इन्कम टॅक्स द्यावा लागत नाही.
या देशांची अर्थव्यवस्था मुख्यतः तेल, पर्यटन आणि अप्रत्यक्ष करांवर आधारित आहे.
नैसर्गिक संपत्तीमुळे हे देश टॅक्स-फ्री असूनही आर्थिकदृष्ट्या मजबूत आहेत.
Tax-Free Countries: आपल्या देशात उत्पन्नावर आधारित सरकारकडून इन्कम टॅक्स लावला जातो. जास्त कमाई असेल, तर जास्त कर द्यावा लागतो. पण जगात काही असेही देश आहेत, जिथे नागरिकांना त्यांच्या कमाईवर एकही रुपया कर द्यावा लागत नाही. म्हणजेच संपूर्ण कमाई त्यांच्या खिशातच जाते. हे देश आर्थिकदृष्ट्याही सक्षम आहेत, मग अशा वेळी प्रश्न पडतो – या देशांची अर्थव्यवस्था नेमकी चालते तरी कशी?