
Zomato, Swiggy Shares: 21 डिसेंबर रोजी होणाऱ्या जीएसटी कौन्सिलच्या 55व्या बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होऊन निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. यामध्ये झोमॅटो आणि स्विगी या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म सारख्या फूड डिलिव्हरी कंपन्यांचा कर कमी करण्याच्या प्रस्तावाचाही समावेश आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सरकार फूड डिलिव्हरी सेवांवर सध्याचा 18% GST कमी करून 5% करण्याचा विचार करत आहे.