Premium|Shree Refrigerations Ltd : संरक्षण क्षेत्रातील तेजीचा श्री रेफ्रिजरेशन्सला फायदा; कंपनीच्या वाढीच्या संधी आणि जोखीम किती?

Shree Refrigerations SME IPO : संरक्षण क्षेत्रातील वाढती सरकारी गुंतवणूक, नौदलासाठी मरीन एचव्हीएसी प्रणाली आणि डेटा सेंटर कूलिंगमधील विस्तारामुळे श्री रेफ्रिजरेशन्सला संधी; मात्र उच्च मूल्यांकन आणि व्यावसायिक जोखमीही महत्त्वाच्या आहेत.
Shree Refrigerations SME IPO

Shree Refrigerations SME IPO

esakal

Updated on: 

भूषण ओक - bhushanoke@hotmail.com

भारत सरकार संरक्षण क्षेत्रात भारतीय कंपन्यांना प्रोत्साहन देत असून, खर्चाच्या बाबतीतही तरतूद वाढविण्यात येत आहे. याचा फायदा अनेक छोट्या कंपन्यांना होत आहे. याचेच एक उदाहरण म्हणजे श्री रेफ्रिजरेशन्स लि. ही कंपनी आहे. नौदलासाठी मिशन-क्रिटिकल मरीन एचव्हीएसी प्रणाली पुरवण्यातील मजबूत स्थान, वाढता संरक्षण खर्च आणि डेटा सेंटर कूलिंगमधील विस्तारामुळे तिच्या व्यवसायवाढीला मोठी संधी निर्माण झाली आहे. मात्र, उच्च मूल्यांकन, सरकारी ग्राहकांवरील अवलंबित्व आणि कच्च्या मालाच्या किमतीतील चढ-उतार या जोखमीही लक्षात घेणे आवश्यक आहे.

कोविड महासाथीच्या काळाआधी आणि नंतरही पूरक सरकारी धोरणांमुळे अनेक नव्या उद्योगधंद्यांना वाढता वाव मिळाला. रेल्वे, संरक्षण, पायाभूत सुविधा आणि ऊर्जा क्षेत्रांमध्ये गेल्या पाच वर्षांमध्ये भरीव सरकारी गुंतवणूक झाली आणि ती येत्या पाच वर्षांमध्ये तशीच सुरू राहील, असे संकेत आहेत. या सर्व क्षेत्रांच्या मूल्यसाखळीत साहजिकच उत्तम वाढ बघायला मिळाली आणि त्या क्षेत्रातील अनेक कंपन्यांचा व्यवसाय अनेकपटीने वाढतांना दिसला. ‘मेक इन इंडिया’सारख्या देशांतर्गत उत्पादनाला प्रोत्साहन देणाऱ्या योजनांमुळेही छोटे उद्योगधंदे जोमाने फोफावले. बाजारात नोंदणीकृत नसलेल्या अनेक छोट्या उद्योगांना यामुळे व्यवसायवाढीसाठी भांडवलाची गरज भासू लागली आणि त्यामुळे अनेक कंपन्यांनी कर्जाऐवजी ‘आयपीओ’द्वारे भांडवल मिळवून व्यवसाय वाढवण्याचा मार्ग चोखाळला. कोविड महासाथीनंतर छोटे गुंतवणूकदारही प्रचंड संख्येने शेअर बाजारात प्रत्यक्ष आणि म्युच्युअल फंडांच्या मार्फत अप्रत्यक्ष गुंतवणूक करत आहेत. नुसत्या ‘एसआयपी’च्या माध्यमातून आता सुमारे ३२,००० कोटी रुपये दर महिन्याला बाजारात गुंतवले जात आहेत. शेअर बाजारात २०२४ पासून तेजी नसली, तरी भांडवलाचा हा ओघ कायम आहे. अर्थव्यवस्थेच्या या आर्थिकीकरणामुळे उद्योगांसाठी प्रचंड प्रमाणात पैसा उपलब्ध होत आहे. ‘एसएमई’ मंचावर ‘आयपीओ’ आणण्यासाठी नियम मुख्य मंचापेक्षा थोडे शिथिल असतात आणि खूप छोट्या कंपन्याच ‘एसएमई’ मंचावर पदार्पण करतात. अशा कंपन्यांमध्ये उत्पन्न आणि नफावाढीचा वेग प्रचंड म्हणजे बरेचदा वार्षिक ५० टक्क्यांहून अधिक असतो. मात्र, अशा वाढीसाठी खूप खेळते भांडवल लागते आणि त्यामुळे या कंपन्यांची रोकड आवक खूप कमी आणि बरेचदा ऋणात्मक असते. यात येणाऱ्या बहुतांशी कंपन्या वेगाने वाढणाऱ्या क्षेत्रातील असतात आणि फारच कमी कंपन्यांकडे विशिष्ट क्षेत्रातील स्पर्धात्मक फायदा असतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com