

GDP Growth Rate: भारतीय अर्थव्यवस्थेत सध्या मंदीचे संकेत मिळत आहेत. कारण केंद्र सरकारची संस्था असलेल्या राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयानं अर्थात एनएसओनं यंदाच्या आर्थिक वर्षात जीडीपी वाढीचा दर हा ६.४ टक्के राहील असा अंदाज वर्तवला आहे. हा दर गेल्या चार वर्षातील सर्वात निचांकी दर आहे. रिझर्व्ह बँकेनं देखील नुकताच जीडीपी वाढीचा दर हा ६.६ टक्के राहिलं असं भाकीत केलं होतं.