

Banks to Offer Loans Against Silver Assets: Major Policy Update
Sakal
-अशोक जोशी, निवृत्त बँक अधिकारी
अडीअडचणीच्या प्रसंगी किंवा मोठ्या रकमेची गरज भासल्यास आपल्याकडील सोने गहाण ठेवून बँका, बिगरबँकिंग वित्तीय संस्था (एनबीएफसी) यांच्याकडून कर्ज घेता येते याची सर्वांना माहिती आहे. परंतु, सोन्याचे गगनाला भिडणारे भाव बघता, सोने सर्वसामान्य लोकांच्या आवाक्याबाहेर जाऊ लागले आहे. तुलनेत चांदीचे भाव परवडण्यासारखे आहेत. भारतीय लोकांकडे चांदीही मोठ्या प्रमाणात असते. अशावेळी सोन्याप्रमाणे चांदी गहाण ठेवून कर्ज ठेवण्याची सुविधा मिळणे आवश्यक होते. लोकांची ही गरज लक्षात घेऊन आता भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) आपल्या सोने आणि चांदी तारणावर कर्जाबाबतच्या जुन्या मार्गदर्शक तत्त्वांत दुरुस्ती करून नवे नियम जारी केले आहेत, त्यामुळे आता सोन्याप्रमाणे चांदीवरही कर्ज मिळणे शक्य होणार आहे. या नव्या नियमाची अंमलबजावणी एक एप्रिल २०२६ पासून सुरू होणार आहे.