
Digital Dream, Banking Nightmare: The Check Clearing Chaos.
Sakal
अनिरुद्ध राठी - चार्टर्ड अकाउंटंट- सीए
डिजिटल इंडियाचे स्वप्न दाखवणाऱ्या सरकारने बँकिंगमध्ये क्रांती आणण्याच्या उद्देशाने ४ ऑक्टोबर २०२५ पासून देशभरात ‘सिंगल-डे चेक क्लिअरिंग’ प्रणाली लागू केली. यानुसार, चेक जमा केल्याच्या दिवशीच रक्कम खात्यात जमा होणे अपेक्षित होते. उद्देश चांगला होता पण अंमलबजावणीच्या पहिल्या दिवसापासूनच या महत्त्वाकांक्षी योजनेचा पुरता बोजवारा उडाला आहे.