

SIP Investment Strategy Explained Why Market Corrections Can Help Mutual Fund Investors Accumulate More Units Over Time
sakal
- डॉ. वीरेंद्र ताटके, गुंतवणूक विषयाचे अभ्यासक
गेली दोन वर्षे तुम्ही म्युच्युअल फंडातील एखाद्या योजनेत नियमितपणे ‘एसआयपी’द्वारे गुंतवणूक करत असाल आणि त्या गुंतवणुकीवर तुम्हाला तोटा दिसत असेल, तर दोन कारणांसाठी तुमचे हार्दिक अभिनंदन! पहिले कारण म्हणजे तोटा दिसत असूनही तुम्ही संयम राखून ‘एसआयपी’ सुरू ठेवल्याबद्दल आणि दुसरे कारण म्हणजे तुम्हाला या कालावधीत स्वस्तात खरेदी करण्याची संधी मिळाली म्हणून.