

Mutual Fund SIP Investors Win Again as Systematic Investment Plans Reward Long Term Investing and Financial Discipline
sakal
शेअर बाजारातील चढ-उतारांना घाबरून न जाता ‘एसआयपी’च्या माध्यमातून गुंतवणूक नियमितपणे सुरू ठेवणारा गुंतवणूकदार विजेता ठरतो, हे २०२६ या वर्षात पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. यासाठी एक उदाहरण पाहू या. समजा, रमेश आणि सुरेश या दोन गुंतवणूकदारांनी जानेवारी २०२६ मध्ये आदित्य बिर्ला सन लाइफ लार्ज कॅप फंडात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. दोघांनीही गुंतवणुकीसाठी रेग्युलर प्लॅन निवडून ग्रोथ ऑप्शन घेतला; मात्र दोघांची गुंतवणुकीची पद्धत वेगवेगळी होती. त्यामुळे बाजारातील घसरणीच्या काळात त्यांनी घेतलेले निर्णयही वेगळे होते.