
वसंत कुलकर्णी, ज्येष्ठ गुंतवणूक सल्लागार
vasant@vasantkulkarni.com
नव्याने गुंतवणूक संधीच्या शोधात असलेल्या गुंतवणूकदारांसाठी एक उत्तम म्युच्युअल फंड पर्याय म्हणजे निप्पॉन इंडिया लार्ज कॅप फंड आहे. ‘इंडिया ग्रोथ स्टोरी’वर ज्यांचा विश्वास आहे आणि पुढील दशक भारताचे आहे, असे जे मानतात त्यांनी या फंडाची जरूर निवड करावी. जे गुंतवणूकदार नव्याने ‘एसआयपी’ सुरू करू इच्छितात त्यांच्यासाठीदेखील हा फंड (जो पूर्वी रिलायन्स टॉप २०० फंड) उत्तम पर्याय आहे. जाणून घेऊ या या फंडाविषयी...