
SIP Booster Dose
E sakal
डॉ. वीरेंद्र ताटके
tatakevv@yahoo.com
तरुणांनी ‘एसआयपी’ पद्धतीने गुंतवणूक शक्य तितक्या लवकर सुरू करायला हवी. ‘एसआयपी’ एक वर्षासाठी न करता दीर्घकाळासाठी केली, तर त्यातील जोखीम कमी होते आणि फायदा होण्याची शक्यतासुद्धा वाढते. दरवर्षी ‘एसआयपी’ची रक्कम आपोआप वाढविण्यासाठी ‘टॉप-अप एसआयपी’ हा पर्याय निवडला, तर ‘एसआयपी’ची रक्कम दरवर्षी वाढत राहील.
अनिकेत : सर, मी माझ्या एका मित्राला गेल्या वर्षी ‘एसआयपी’ सुरू करण्याचा सल्ला दिला होता. आम्ही दोघांनीही एका चांगल्या म्युच्युअल फंडात एक वर्ष कालावधीची ‘एसआयपी’ केली होती. गेल्या महिन्यात त्या ‘एसआयपी’चा कालावधी पूर्ण झाला. आम्हाला दोघांनाही त्यावर पंधरा टक्के फायदा झाला. सर, तुम्ही नेहमी म्युच्युअल फंड ‘एसआयपी’ची माहिती देत असता त्याचा आम्हाला खूप फायदा झाला.
शिक्षक : अरे वा! फारच चांगलं काम केलं आहेस तू! तुमच्यासारख्या तरुणांनी ‘एसआयपी’ पद्धतीने गुंतवणूक शक्य तितक्या लवकर सुरू करायला हवी. तुझ्यासोबत तुझ्या मित्रालासुद्धा अशी गुंतवणूक सुरू करण्यासाठी तू प्रोत्साहन दिलंस, हे तर खूपच उत्तम केलंस.
या एसआयपीबद्दलच आज आपण चर्चा करूया.