
डॉ. वीरेंद्र ताटके - गुंतवणूक विषयाचे अभ्यासक
गेल्या काही दिवसांत ‘स्मॉल कॅप शेअरची धूळधाण झाली’ अशा आशयाच्या बातम्या दिसत आहेत. त्यासाठी राष्ट्रीय शेअर बाजारातील छोट्या कंपन्यांचे प्रतिनिधित्व करणारा ‘निफ्टी स्मॉल कॅप १०० इंडेक्स’सुद्धा गेल्या काही दिवसांतील त्याच्या सर्वांत खालच्या पातळीवर आला आहे, असा दाखलासुद्धा दिला जात आहे. शेअर बाजारातील केवळ स्मॉल कॅप शेअरच नव्हे, तर इतर बहुसंख्य शेअरसुद्धा त्यांच्या सर्वोच्च पातळीपासून खाली आले आहेत, हे सत्य आहे. या पडझडीचे प्रतिबिंब म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीतदेखील दिसत असून, बहुसंख्य गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओचे बाजारमूल्य घसरले आहे. हे सर्व सत्य असले, तरी या परिस्थितीकडे आपण सकारात्मक दृष्टिकोनातून पाहू शकतो का, हा विचार करणे गरजेचे आहे.