

विक्रम अवसरीकर
vikram.awsarikar@gmail.com
पैशांची विभागणी म्हणजे निरनिराळ्या ठिकाणी पैसे विखरून ठेवणे. म्हणजे अॅसेट अॅलोकेशन!!’’ म्हणूनच आपले पैसे कसे गुंतवले पाहिजेत याची एक पक्की योजना आपल्याकडे पाहिजे. कारण एकाच पद्धतीने सगळ्या रकमेची गुंतवणूक करणं अत्यंत धोक्याचं आहे.
मग काय करावे? आपल्याकडे एक योजना असेल तर त्या योजनेनुसार पैसे गुंतवावेत; पण या प्रकारची निरीक्षणावर अवलंबून असलेली पद्धत वापरताना ठरावीक पैसेच त्याला दिले पाहिजेत,
असं आहे का? की मग आपण असं काहीतरी केलं पाहिजे की जी रक्कम बुडाली तरी चालेल, आपल्याला काही वाटणार नाही आणि आपली बाकीची गुंतवणूक चालूच राहील अशी रक्कम शोधली पाहिजे किंवा तयार केली पाहिजे.