

Asset Allocation
esakal
गुंतवणुकीच्या जगात ॲसेट क्लासेसची ‘लपाछपी’ ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. प्रत्येक ॲसेट क्लास कधीतरी आघाडीवर येतो, तर कधी मागे पडतो. या गतीला समजून घेणे, आर्थिक निर्देशकांवर लक्ष ठेवणे आणि त्यानुसार ॲसेट ॲलोकेशन व रीबॅलन्सिंग करणे हे स्मार्ट गुंतवणुकीचे लक्षण आहे. प्रत्येकाला जीवनात आर्थिक स्थैर्य आणि समृद्धी हवी असते. भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी योग्य आर्थिक नियोजन करणे अपरिहार्य ठरते. परंतु, हे नियोजन केवळ पैसे वाचवण्यापुरते मर्यादित नसून, योग्य ठिकाणी गुंतवणूक करणे हे त्यामागील महत्त्वाचे सूत्र आहे. त्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. मात्र, त्यांची कामगिरी वेळोवेळी बदलत असते, त्यांची ही ‘लपाछपी’ आर्थिक नियोजनालाही दिशा देते.
जारात गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत, ज्याला आपण ‘ॲसेट क्लास’ म्हणतो. इक्विटी (शेअर बाजार), डेट (कर्जरोखे बाजार), सोने (कमोडिटीज) आणि स्थावर मालमत्ता (रिअल इस्टेट) हे प्रमुख ‘ॲसेट क्लास’ आहेत. यांची कामगिरी वेळोवेळी बदलत असते. कधी एखादा ‘क्लास’ जबरदस्त परतावा देतो, तर कधी दुसरा. हीच ॲसेट क्लासेसची ‘लपाछपी’ समजून घेणे आणि आपल्या आर्थिक नियोजनाला दिशा देणे गरजेचे असते. ही ‘लपाछपी’ कशी होते, कोणते घटक तिला चालना देतात आणि त्यातून पुढे राहण्यासाठी पोर्टफोलिओचे उत्तम व्यवस्थापन कसे करावे, हे जाणून घेऊ या.