स्मार्ट विश्लेषण : ट्रान्सरेल लायटिंग (शुक्रवारचा बंद भाव : रु. ५०८)

ट्रान्सरेल लायटिंगचा मुख्य व्यवसाय वीजवहन, सबस्टेशन व रेल्वे विद्युतीकरण; १६,३६१ कोटींच्या ऑर्डरबुकसह २०-२२ टक्के महसूलवाढीचे लक्ष्य
Transrail Lighting has a strong order book and expansion plans, making it a stock worth tracking for long-term investors.

Transrail Lighting has a strong order book and expansion plans, making it a stock worth tracking for long-term investors.

Sakal

Updated on

भूषण ओक, शेअर बाजार विश्‍लेषक

ट्रान्सरेल लायटिंग ही कंपनी वीजवहनासाठी टॉवर आणि विजेच्या तारा म्हणजे कंडक्टर बनवते आणि अशा प्रकल्पांची ईपीसी कंत्रांटे घेते. या कंपनीची सुरुवात २००८ मध्ये एक विजेचे खांब बनवणारी कंपनी म्हणून झाली. कंपनीने २०१६ मध्ये ‘गॅमन इंडिया’चा वीजवहन आणि वितरण व्यवसाय घेऊन वीजवहन, सबस्टेशन, रेल्वे विद्युतीकरण आणि बांधकाम क्षेत्रात पदार्पण केले, आता हाच तिचा मुख्य व्यवसाय आहे. कंपनीचे देशात पाच ठिकाणी उत्पादन प्रकल्प असून, २७०० हून अधिक कर्मचारी आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com