

ATM Charge Changes
ESakal
जर तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) चे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी एक मोठी बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने एटीएम व्यवहार शुल्कात बदल केले आहेत. मोफत व्यवहार मर्यादा पूर्ण झाल्यानंतर बँकेने एटीएम वापर शुल्कात वाढ केली आहे. याचा अर्थ असा की जर तुम्ही एसबीआयचे ग्राहक असाल तर मासिक रोख रक्कम काढण्याची मर्यादा पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या बँकेच्या एटीएममधून प्रत्येक रोख रकमेसाठी तुम्हाला ₹२३ आणि तुमचा बॅलन्स तपासण्यासारख्या गैर-आर्थिक व्यवहारांसाठी ₹११ आकारले जातील.