स्टीलकास्ट

भावनगर (गुजरात) येथील स्टीलकास्ट कंपनी १९६० पासून कार्यरत असून, १९९४ पासून शेअर बाजारात सूचीबद्ध आहे. कंपनी विविध उद्योगांसाठी पोलादाच्या ओतीव भागांचे उत्पादन करते आणि त्यांची वार्षिक उत्पादन क्षमता २९,००० टन आहे.
Steelcast
Steelcast Sakal
Updated on

भूषण ओक - भांडवली बाजाराचे अभ्यासक-विश्‍लेषक

गुजरातमधील भावनगर येथे १९६० मध्ये स्थापन झालेली स्टीलकास्ट ही कंपनी १९९४ पासून शेअर बाजारात नोंदणीकृत आहे. पोलादाच्या ओतीव (कास्टिंग) भागांची या कंपनीची उत्पादने उत्खनन, खाणकाम, बांधकाम, रेल्वे, सिमेंट, ऑटो आणि संरक्षण क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या यंत्रांसाठी उपयोगाला येतात. ही कंपनी पाच किलोपासून ते २५०० किलोपर्यंत ओतीव पोलादाच्या उत्पादनांची निर्मिती करते आणि ७५ टक्के उत्पादने मशिनिंग करून ग्राहकांना उपयोगासाठी अगदी तयार अशी पुरवली जातात. कंपनीची सध्याची उत्पादन क्षमता प्रतिवर्ष सुमारे २९,००० टन इतकी आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com