

Portfolio Management Tips
sakal
सुरुवातीला उत्साहाच्या भरात याने सांगितले, त्याने सांगितले, कधी स्वतःच असे अनेक शेअर घेतले गेले. काही शेअर म्हणजे मिसेस बेक्टर फूड्स किंवा नारायण हृदयालय चांगले तिप्पट-चौपट वाढले, तरी एकंदरीत पोर्टफोलिओवर फारसा फरक पडलेला दिसला नाही. शेअरची संख्या इतकी होती, की या एक-दोन शेअरमुळे फारसा फरक पडलेला दिसलाच नाही. काही क्षेत्रांमध्ये खूप गुंतवणूक, काही क्षेत्रांमध्ये पोर्टफोलिओच्या अर्धा टक्का; पण नाही. यामुळे पोर्टफोलिओचे शेपूट वाढत गेले. असे होऊ नये म्हणून काही खबरदारी घेणे आवश्यक ठरते.