
श्रीनिवास जाखोटिया, रितेश मुथियान
शेअर बाजार हा नेहमी आपल्या अपेक्षेपेक्षा वेगळा वागत असतो. जेव्हा दुनिया तेजीत असते, तेव्हा बाजार मंदी दाखवतो आणि जेव्हा दुनिया मंदीत असते तेव्हा बाजार तेजी दाखवतो. हाच शेअर बाजाराचा मूळ धर्म आहे. त्यामुळे शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांनी नव्या वर्षात शेअर बाजाराची वाटचाल कशी असेल, याचा विचार न करता, जेव्हा जेव्हा मोठी पडझड दिसेल तेव्हा ‘मोका’ साधायला हवा आणि खरेदी करायला हवी.