

Multi Cap Funds Investment Strategy Benefits Risks and How Large Mid and Small Cap Stocks Balance Your Mutual Fund Portfolio
sakal
-संजय खरसिंगे, अनुभवी गुंतवणूक सल्लागार
भू-राजकीय तणाव, सुरू असलेली युद्धे, महागाई, कच्च्या तेलाच्या दरामधील चढ-उतार, व्याजदरांबाबतची अनिश्चितता आणि जागतिक आर्थिक विकासाबाबतच्या चिंता यांमुळे वित्तीय बाजारपेठांमध्ये सातत्याने अस्थिरता निर्माण होत आहे. अशा परिस्थितीत अनेक गुंतवणूकदारांच्या मनात सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन अर्थात ‘एसआयपी’ थांबवणे, गुंतवणुकीची रक्कम रोख स्वरूपात ठेवणे किंवा गुंतवणूक पोर्टफोलिओमध्ये मोठे बदल करणे असे विचार येऊ शकतात. मात्र, यशस्वी गुंतवणुकीसाठी बाजारातील प्रत्येक चढ-उतारावर प्रतिक्रिया देण्यापेक्षा शिस्तबद्ध गुंतवणूक करणे आणि आर्थिक उद्दिष्टांशी बांधिलकी कायम ठेवणे अधिक महत्त्वाचे असते.