
सतीश धनबालन यांनी नेली ‘दिंडीगुल बिर्याणी’ जगभर
E sakal
सुधीर जोगळेकर
sumajo51@gmail.com
अमेरिकेत येईपर्यंत मी दिंडीगुल हे नाव ऐकलं होतं, ते तमिळनाडू राज्यातील एका जिल्ह्याचं केंद्र म्हणून. गाव तसं छोटं, जेमतेम दोन-सव्वा दोन लाख लोकसंख्येचं, पण ते ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेलं. गावात किल्ला आहे, सोळाव्या शतकात बांधलेला.
गावात मंदिरं, मशिदी, चर्च अनेक आहेत; पण गावातलं धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचं स्थान आहे ते अठरावं शक्तिपीठ... श्री अभिराम पीठ. गावातल्या विख्यात उद्योगातला महत्त्वाचा उद्योग कुलूपं बनवण्याचा. सर्वांत मजबूत आणि टिकाऊ कुलूपं बनवणारं शहर म्हणून ते ओळखलं जातं. त्यामुळे त्याला ‘लॉक सिटी’ असंही म्हटलं जातं.
दिंडीगुल लोखंडासाठी प्रसिद्ध आहे, त्यामुळे इथली कुलूपं लोखंडी. काही कुलुपं, तर उघडायला एक चावी आणि बंद करायला दुसरी चावी अशाही तंत्राची... अमेरिकेत आलो आणि दिंडीगुल हे नाव एका दाक्षिणात्य रेस्टॉरंटचं असल्याचं लक्षात आलं. त्याचीच ही कथा.