Premium|Business owners time management : उद्योजकांसाठी वेळेचे व्यवस्थापनच खरे भांडवल; ‘गल्ला सोडा, पुढे वाढा’ म्हणत प्रत्येक मिनिटाचा हिशोब ठेवण्याचा मंत्र

Time Management Tips for Entrepreneurs : व्यवसायात पैसा गमावला तर परत मिळू शकतो, पण गेलेली वेळ कधीच परत येत नाही. उद्योजकांनी स्वतःला गल्ल्यापुरते मर्यादित न ठेवता 'खुर्ची सोडून' व्यवसाय कसा वाढवावा, यावर प्रकाश टाकणारा विशेष लेख.
Time Management Tips for Entrepreneurs

Time Management Tips for Entrepreneurs

esakal

Updated on

चकोर गांधी - chakorgandhi@gmail.com

वेळ हे व्यवसायातील सर्वांत मौल्यवान साधन आहे; पण अनेक उद्योजक त्याचाच सर्वांत जास्त अपव्यय करतात. पैसा गमावला तर परत मिळू शकतो; पण गेलेली वेळ परत येत नाही. म्हणूनच, वेळेचे योग्य व्यवस्थापन हेच यशस्वी व्यवसायाचे खरे गुपित आहे.

व्यवसाय-धंद्यामध्ये वेळ इतका महत्त्वाचा असेल, तर तो कुठे खर्च करायचा आणि कुठे वाचवायचा हे समजणेही तितकेच महत्त्वाचे आहे. या लेखामध्ये व्यवसायातील वेळेचा योग्य लेखाजोखा मांडलेला आहे. म्हणजेच, मालकाने काय करायचे आणि काय करायचे नाही हे ठरवले पाहिजे. अजित रिटेल वेअर यांनी एक सुंदर टॅगलाइन लिहिली आहे, ‘‘गल्ला सोडा, पुढे वाढा.’’ ज्यांनी गल्ला सोडला, त्यांची अनेक दुकाने झाली. म्हणजेच, चांगली माणसे नेमून त्यांच्यावर काही गोष्टी सोपवायला हव्यात. जो मालक गल्ल्यावर बसतो, त्याचे लक्ष फक्त गल्ल्यावरच राहते व तो खुर्ची सोडत नाही. मोठा धंदा करायचा असेल, तर सर्वप्रथम खुर्ची सोडावी लागेल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com