
अशोक जोशी - निवृत्त बँक अधिकारी
सर्वोच्च न्यायालयाने के. गोपी विरूद्ध उपनिबंधक व इतर या तमिळनाडू राज्यातील अपीलावर (क्रमांक ३९५४/२०२५) निकाल देताना सात एप्रिल २०२५ रोजी एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे. तमिळनाडूमधील उपनिबंधकांनी, याचिकाकर्त्याने मालमत्तेसंबंधीचे आपले मालकी हक्क प्रस्थापित न केल्याने नोंदणीसाठी दाखल केलेले विक्रीपत्र तमिळनाडू राज्याच्या नियम ५५ अ (एक)चा आधार घेत नोंदणी करण्यास नकार दिला. या निर्णयाविरुद्ध याचिकाकर्त्याने सर्वोच्च न्यायालयात अपील केले.