

EPFO
ESakal
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजनेतील वेतन मर्यादेत सुधारणा करण्याबाबत चार महिन्यांत निर्णय घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी केंद्र सरकारला दिले. गेल्या ११ वर्षांपासून ही मर्यादा अपरिवर्तित आहे. सामाजिक कार्यकर्ते नवीन प्रकाश नौटियाल यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती जे.के. माहेश्वरी आणि ए.एस. चांदुरकर यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला आहे.