
ॲड. रोहित एरंडे - कायद्याचे अभ्यासक
सध्याच्या ‘वन क्लिक अवे’च्या जमान्यात अनोळखी वेबसाइटवर ऑनलाइन खरेदीवर मिळणाऱ्या सवलतीच्या मोहाने अनेक ग्राहक फसवणुकीला बळी पडतात. जेव्हा असा गैरप्रकार घडतो, ज्यात खातेदाराची किंवा बँकेची चूक नसते, तरीही अशी गेलेली रक्कम भरून देण्याची जबाबदारी बँकेची असते का? असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयापुढे नुकताच उपस्थित झाला. भारतीय स्टेट बँकेने अशा फसवणूकप्रकरणी नुकसानभरपाई देण्यास नकार दिल्याने एका ग्राहकाने गुवाहाटी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.