

retirement planning
esakal
ॲड. सुनील टाकळकर- takalkars49@gmail.com
वृद्धापकाळी कोणासमोर हात पसरण्याची वेळ येऊ नये म्हणून तरुणपणीच हात हलवणे (गुंतवणूक करणे) शहाणपणाचे ठरते. पिढ्यान््पिढ्या चालत आलेल्या या भावनिक विचाराचा बहुतेक भारतीयांना विसर पडलेला दिसतो आहे. निवृत्ती किंवा रिटायरमेंट हा शब्द कानावर पडताच आजही अनेकांच्या डोळ्यांसमोर आरामदायी आयुष्य, फिरणे आणि निवांत वेळ अशी चित्रे येतात. मात्र, या स्वप्नांना प्रत्यक्षात आणण्यासाठी लागणाऱ्या आर्थिक गणिताबाबत भारतीय गाफील आहेत, असे वाटते.
कत्याच प्रसिद्ध झालेल्या ॲक्सिस मॅक्स लाइफ इन्शुरन्स निवृत्ती निधी निर्देशांक पाहणीनुसार (इंडिया रिटायरमेंट इंडेक्स स्टडी आयआरआयएस) बहुतांश भारतीयांना निवृत्तीसाठी किती रक्कम लागेल, याचा निश्चित अंदाज करता येत नसल्याचे दिसून आले आहे. या पाहणीतील प्रमुख मुद्दे आणि निरीक्षणे पुढीलप्रमाणे-