
Latest New IPO: टाटा कॅपिटलच्या आयपीओची सध्या चर्चा आहे. हा आयपीओ सामान्य गुंतवणूकदारांसाठी खुला होण्यापूर्वीच बाजारात कमाल करीत आहे. भारतातील आणि भारताबाहेरील मोठ्या संस्थात्मक गुंतवणूकदारांनी कंपनीमध्ये कोट्यवधींची गुंतवणूक केली आहे.
टाटा समूहाची नॉन-बँकिंग वित्तीय कंपनी (NBFC) असलेल्या टाटा कॅपिटलचा (Tata Capital) आयपीओची सामान्य गुंतवणूकदारांना प्रतीक्षा आहे. या कंपनीत देशातील आणि विदेशातील दिग्गज संस्थात्मक गुंतवणूकदारांनी मोठी गुंतवणूक केली आहे. अशा गुंतवणुकीला अँकर गुंतवणूक म्हणतात.