

Tata Trusts to Move Bombay High Court Against N Chandrasekaran's Reappointment
eSakal
Tata Sons Chairman: टाटा समूहातील अंतर्गत मतभेद आता न्यायालयापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. एन. चंद्रशेखरन यांच्या टाटा सन्सच्या कार्यकारी अध्यक्षपदी झालेल्या पुनर्नियुक्तीला आव्हान देण्यासाठी सर दोराबजी टाटा ट्रस्ट (SDTT) आणि आर. डी. टाटा ट्रस्ट (RDTT) यांनी मुंबई उच्च न्यायालयात स्वतंत्र खटले दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.
या प्रकरणात दोन्ही ट्रस्ट मिळून ६५ कोटी रुपयांची नुकसानभरपाई आणि त्यावर वार्षिक १८ टक्के व्याज मागणार आहेत.