Tax Harvesting Sakal
Sakal Money
‘टॅक्स हार्वेस्टिंग’ची!
टॅक्स हार्वेस्टिंग म्हणजे भांडवली कर कमी करण्याची कायदेशीर प्रक्रिया. यामध्ये लघु व दीर्घ भांडवली नफा-तोटा समजून घेऊन योग्य नियोजन करता येते.
सुहास राजदेरकर - ज्येष्ठ गुंतवणूक सल्लागार
‘टॅक्स हार्वेस्टिंग’ हे कायदेशीर आहे. हार्वेस्ट म्हणजे कापणे किंवा तोडणे. टॅक्स हार्वेस्टिंग म्हणजे भांडवली कर कमी किंवा शून्य करणे. एका मालमत्ता विभागाचा भांडवली नफा त्याच किंवा दुसऱ्या मालमत्ता विभागामधील तोट्याबरोबर जुळवून (सेट ऑफ) झालेला नफा कमी करणे. भांडवली नफा कमी झाला, की अर्थातच भांडवली कर कमी होणार. एखाद्या वर्षात तुम्हाला भांडवली नफा झालेला नसेल, तरीसुद्धा या वर्षीचा भांडवली तोटा, पुढील वर्षातील भांडवली नफ्याबरोबर सेट ऑफ करता येतो.

