
TCS Employee
ESakal
नोकरकपातीच्या लाटेनंतर टीसीएसने अखेर आपल्या कर्मचाऱ्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. देशातील सर्वात मोठी आयटी सेवा कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) ने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी त्रैमासिक परिवर्तनीय भत्ता (क्यूव्हीए) जाहीर केला आहे. कनिष्ठ स्तरावरील कर्मचाऱ्यांसाठी १०० टक्के परिवर्तनीय वेतन देखील जाहीर केले आहे. त्याच वेळी, मध्यम आणि वरिष्ठ पातळीवरील कर्मचाऱ्यांना गेल्या वर्षीपेक्षा जास्त परिवर्तनीय वेतन देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.