
TCS layoffs in Pune force over 2,500 IT employees to resign, raising concerns about job security in the technology sector.
esakal
TCS Layoffs in Pune: Major IT Job Cuts : टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) मधील ''बेकायदेशीर कपात'मध्ये हस्तक्षेप करण्याची विनंती नॅसेंट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एम्प्लॉईज सिनेट (एनआयटीईएस) ने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक तातडीचे पत्र लिहून केली आहे.
या तक्रारीनुसार, कॉर्पोरेट जबाबदारी आणि मध्यम-करिअर आयटी व्यावसायिकांच्या भविष्याबद्दल चिंता निर्माण झाली आहे. कारण, अलिकडच्या काळात पुण्यातील सुमारे अडीच कर्मचाऱ्यांना राजीनामा देण्यास भाग पाडण्यात आले आहे, त्यांना अचानक कामावरून काढून टाकण्यात आले आहे.
मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात महाराष्ट्र कामगार विभागाने तातडीने कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याची चौकशी करावी आणि इतर कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणे थांबवावे. शिवाय कर्मचाऱ्यांना कायदेशीर भरपाई मिळेल याची खात्री करावी. उल्लंघन केल्याबद्दल टीसीएस व्यवस्थापनाला जबाबदार धरावे अशीही मागणी करण्यात आली आहे.
NITES चे अध्यक्ष आणि वकील हरप्रीत सिंग सलुजा यांनी या संदर्भात सांगितले की, कंपनीच्या या निर्णयाने प्रभावित झालेले बहुतेक कर्मचारी मध्यम ते वरिष्ठ पातळीचे व्यावसायिक आहेत. ज्यांनी जवळपास दहा ते वीस वर्षे सेवा केलेली आहे.
एवढंच नाहीतर अनेक कर्मचारी ४० वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत, ज्यांच्यावर ईएमआय, मुलांच्या शाळांची फी आणि वृद्ध पालकांच्या जबाबदाऱ्यांचा भार आहे. परंतु अचानक नोकरी गेल्याने संपूर्ण कुटुंब आर्थिक संकटात सापडले आहे, त्यांच्यासमोर उदरनिर्वाहसोबतच या जबाबदाऱ्या कशा पार पाडायच्या, हा यक्ष प्रश्न निर्माणा झालेला आहे. असे तक्रारीत नमूद केले आहे.
या मुद्य्यामुळे पुण्यातील आयटी जॉब मार्केटच्या स्थिरतेबद्दल गंभीर चिंता निर्माण झाली आहे. रोजगारासाठी योग्य आणि सुरक्षित ठिकाण म्हणून आतापर्यंत लौकीक असणाऱ्या पुणे शहरासाठी ही धक्कादायक बाब आहे आणि यामुळे येथील रोजगार सुरक्षिततेबाबतही प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे. कारण, महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरातून मोठ्यासंख्येने युवक या ठिकाणी रोजगारासाठी येत असतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.