
Accenture announces mass layoffs of over 11,000 employees as AI reshapes the IT job market.
esakal
AI Impact on IT Industry Jobs: कन्स्लटिंग फर्म अॅक्सेंचरने मागील तीन महिन्यात ११ हजारांपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना कंपनीतून काढले आहे आणि शक्यता आहे की, ही कर्मचारी कपात अशाचप्रकारे सुरू राहील. ही फर्म एक मोठ्या बदलाच्या काळातून जात आहे. कंपनीला अशाप्रकारे डिझाइन केलं जात आहे, जिथे कन्स्लटंट ऐवजी आर्टिफिशियल इंटेलिजन्सची (एआय) मदत घेता येईल.
बिझनेस इनासाइडरच्या रिपोर्टनुसार, अॅक्सेंचरने त्या कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यांना एआयशी निगडीत कामांसाठी पुन्हा प्रशिक्षिण देता येणार नाही. खरंतर, कंपनी पुढील वर्षभरात आणखी जास्त लोकांना कामावर घेण्याचे नियोजन करत आहे आणि अॅक्सेंचरने ८६.५ कोटी डॉलरची रिस्ट्रक्चरिंग योजनाही सुरू केली आहे.
तर कंपनीच्या सीईओ जुली स्वीट यांनी सांगितले आहे की, ऑगस्ट अखेरपर्यंत कंपनीत ७७९००० पेक्षा अधिकजण कार्यरत होते. तर तीन महिनेआधी ही संख्या ७९१००० होती. त्यांनी स्पष्ट केले की, रिस्किलिंग हाच सर्वात उत्तम पर्याय आहे. परंतु सर्व कर्मचाऱ्यांसाठी हे शक्य नाही. तर सीईओ जुली यांनी असंही म्हटलं की, तंत्रज्ञानाच्या प्रत्येक नव्या लाटेचा एक कालावधी असतो. जेव्हा तुम्हाला ट्रेनिंग आणि रिस्किलिंगची आवश्यकता असते. अॅक्सेंचरचे उद्दिष्ट हे मोठ्याप्रमाणावर करणे आहे.
एआयच्या या उभरत्या काळात बहुतांश कंपन्या त्यावर विश्वास दाखवत आहेत. हेच कारण आहे की, आयटी सेक्टमधील दिग्गज कंपनी एआयमुळे मोठ्याप्रमाणावर कपात करत आहे. अशातच मायक्रोसॉफ्टनेही अनेक कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले. परंतु कंपनीने नवीन लोकांचीही भरती करून घेतली आहे. ज्यामुळे कर्मचाऱ्यांच्या संख्येत काही बदल झालेला नाही.
अशाचप्रकारे मार्क झकरबर्गच्या मेटा ने देखील या वर्षाच्या सुरुवातीस आपल्या एकूण मनुष्यबळाच्या जवळपास पाच टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून काढले होते. परंतु लवकरच एआयच्या आधारावर भरती सुरू केली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.