करकायदा : कपात केलेला ‘टीडीएस’ जमा न केल्यास...

टीडीएस कपात होऊनही सरकारकडे जमा न झाल्यास करदात्यांवर दुहेरी करभार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे करकपातीचे क्रेडिट देण्याबाबत महत्त्वाची स्पष्टता
TDS Deducted but Not Deposited: Bombay HC Clarifies Tax Credit for Taxpayers

TDS Deducted but Not Deposited: Bombay HC Clarifies Tax Credit for Taxpayers

Sakal

Updated on

डॉ. दिलीप सातभाई, ज्येष्ठ चार्टर्ड अकाउंटंट- सीए

पगार किंवा अन्य देयकातून प्राप्तिकराची उदगम करकपात (टीडीएस) करण्यात आली; मात्र करकपात करणाऱ्या व्यक्तीने किंवा संस्थेने तो कर सरकारकडे जमा केला नाही, तर त्या कराचा लाभ संबंधित करदात्याला मिळणार का, हा प्रश्न अनेक वर्षांपासून वादाचा विषय होता. ‘अस्लम चेकर्स विरुद्ध प्राप्तिकर अधिकारी’ तसेच या समस्येने बाधित झालेल्या इतर करदात्यांनी दाखल केलेल्या प्रकरणांमध्ये मुंबई उच्च न्यायालयाने एकत्रित दिलेल्या निर्णयातून या प्रश्नावर महत्त्वपूर्ण स्पष्टता केली आहे.

न्यायालयाने स्पष्ट केले, की कराची प्रत्यक्ष कपात झाली आहे, हे करदात्याने विश्वसनीय पुराव्यांद्वारे सिद्ध केले, तर त्या कपातीचे क्रेडिट करदात्याला नाकारता येणार नाही. करकपात करणाऱ्या व्यक्तीने किंवा संस्थेने तो कर सरकारकडे जमा केला नाही, हा दोष करदात्याच्या माथी मारता येणार नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com