Premium| Zero Brokerage Trading : ‘मोफत’ ट्रेडिंग प्लॅटफॉर्मचे वास्तव

Free Investment Apps India : 'मोफत' गुंतवणुकीच्या नावाखाली गुंतवणूकदारांना 'उत्पादन' बनवणारे डिस्काउंट ब्रोकरेजचे मायाजाल; ९१ टक्के ट्रेडर तोट्यात असूनही 'डोपामाइन' आणि 'गेमिफिकेशन'च्या सापळ्यात अडकून तरुण पिढी आपले भांडवल गमावत आहे.
Free Investment Apps India

Free Investment Apps India

esakal

Updated on

किरांग गांधी - kirang.gandhi@gmail.com

आजच्या डिजिटल युगात शेअर बाजारात अगदी एका क्लिकवर गुंतवणूक करता येणे शक्य झाले आहे, त्यामुळे अनेक लोक मोफत ट्रेडिंग सेवा देणाऱ्या प्लॅटफॉर्मकडे वळत आहेत. ‘झीरो ब्रोकरेज’, ‘फ्री ट्रेडिंग’ अशा आकर्षक घोषणा हे प्लॅटफॉर्म करत असतात. याच शून्य खर्चाच्या या मोहात अडकून लाखो गुंतवणूकदार नकळत स्वतःचेच भांडवल पणाला लावत आहेत.

आज तुम्ही एखादे डिस्काउंट ब्रोकरेज ॲप किंवा गुंतवणूक प्लॅटफॉर्मवर खाते उघडता, तेव्हा ‘झीरो ब्रोकरेज’, ‘नो कमिशन’, ‘फ्री इन्व्हेस्टमेंट’ अशी आकर्षक घोषवाक्ये तुमच्या स्क्रीनवर झळकतात. वरवर पाहता ही गुंतवणूक क्षेत्रातील मोठी क्रांती वाटते. मात्र, या झगमगत्या पॅकेजिंगखाली एक धोकादायक वास्तव लपलेले आहे. हे प्लॅटफॉर्म अशा पद्धतीने डिझाइन केलेले असतात, की ते सर्वसामान्य, छोट्या गुंतवणूकदारांच्या वर्तनाचा गैरफायदा घेतात. शून्य टक्के ब्रोकरेजच्या मोहमयी आश्वासनांमागे दडलेल्या वर्तणुकीच्या सापळ्यांचा उलगडा करण्यासह भारतीय गुंतवणूकदार म्हणून तुम्ही ग्राहक नसून, प्रत्यक्षात स्वतःच एक ‘उत्पादन’ (Product) कसे आहात, हे आपण समजून घेणार आहोत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com