

Moving Average in Technical Analysis
esakal
शेअर बाजारातील चढ-उतार समजून घेण्यासाठी केवळ अंदाज किंवा बातम्या पुरेशा ठरत नाहीत... त्यामागील ट्रेंड आणि गणित समजून घेणे तितकेच महत्त्वाचे असते. ‘टेक्निकल ॲनालिसिस’मधील ‘मूव्हिंग ॲव्हरेज’ हा असा एक प्रभावी इंडिकेटर आहे, जो बाजारातील गोंधळातून स्पष्ट दिशा दाखवतो आणि गुंतवणूकदाराला सुजाण निर्णय घेण्यास मदत करतो.
रासरी हा शब्द आपण अनेक संदर्भात वापरतो- सरासरी तापमान, पर्जन्यमान किंवा आयुर्मान. परंतु, ‘टेक्निकल ॲनालिसिस’मध्ये हा शब्द ‘मूव्हिंग ॲव्हरेज’ या स्वरूपात नियमितपणे वापरला जातो. एखाद्या शेअर किंवा निर्देशांकाची विशिष्ट कालावधीतील सरासरी किंमत समजून घेण्यासाठी हा इंडिकेटर उपयुक्त ठरतो.
मूव्हिंग ॲव्हरेज म्हणजे अशी सरासरी जी सतत अद्ययावत होत राहते. उदा. दैनंदिन चार्टवर २० दिवसांच्या मूव्हिंग ॲव्हरेजचा विचार केला, तर प्रत्येक नव्या दिवसाचा डेटा समाविष्ट केला जातो आणि सर्वांत जुना डेटा वगळला जातो. त्यामुळे कालावधी तोच राहतो; पण त्यातील डेटा बदलत राहतो- म्हणूनच त्याला ‘मूव्हिंग ॲव्हरेज’ म्हणतात. शेअरच्या भावातील सततचे चढ-उतार आलेखावर दिसत राहिल्यास ‘नॉईज’ निर्माण होतो. ‘मूव्हिंग ॲव्हरेज’ या ‘नॉईज’ला कमी करून ट्रेंड अधिक स्पष्टपणे दाखवते.
१) सिंपल मूव्हिंग ॲव्हरेज (SMA)
२) एक्स्पोनेंशियल मूव्हिंग ॲव्हरेज (EMA)
सिंपल मूव्हिंग ॲव्हरेज (SMA)
‘एसएमए’ काढण्याच्या सूत्रात सर्व डेटा पॉइंट्सना एकसारखेच महत्त्व दिले जाते. म्हणजे समजा, २० दिवसांचे ‘एसएमए’ असेल, तर त्या दिवसांतील शेअरच्या बंद भावाची फक्त बेरीज करून त्याला २० ने भागले, की उत्तर तयार होते.