GST Law Amendments : ‘जीएसटी’तील सुखावह बदल

GST rate reduction changes in India : जीएसटी कायद्यात सुधारणा सुचविण्यात आल्या आहेत, ज्यामुळे व्यापाऱ्यांना दिलासा मिळेल. यामध्ये इन्व्हर्टेड रेट स्ट्रक्चर, मध्यस्थांवर जीएसटी, विक्रीपश्चात डिस्काउंटवर सुधारणा, आणि व्यापारी सुलभीकरणासाठी उपाय सुचविण्यात आले आहेत. हे बदल वाद टाळण्यास मदत करतील.
GST Law Amendments

GST Law Amendments

sakal

Updated on

अॅड. गोविंद पटवर्धन - ज्येष्ठ कर सल्लागार

अनेक वस्तू व सेवांवरील (जीएसटी) कराचे दर सप्टेंबर २०२५ मध्ये कमी करण्यात आले, त्याचे यथोचित स्वागत व्यावसायिकवर्गाने केले. त्याच वेळी व्यापारी सुलभीकरणासाठी ‘जीएसटी’ परिषदेने काही सूचना केल्या होत्या. त्यासाठी कायद्यात बदल आवश्यक होते. त्यानुसार, नव्या अर्थसंकल्पात जीएसटी कायद्यात काही बदल सुचविले आहेत. ते करदात्यांसाठी दिलासादायक आहेत.

इन्व्हर्टेड रेट स्ट्रक्चर कर परतावा

ज्या पुरवठ्याचा करदर त्याचा कच्चा माल व सेवा यांच्यावरील कराच्या दरापेक्षा कमी असतो, त्याला ‘इन्व्हर्टेड रेट स्ट्रक्चर’ म्हणतात. यामुळे इनपुट टॅक्स क्रेडिट पडून राहते व भांडवल गुंतून पडते. अशा प्रकरणांमध्ये ९० टक्के प्रोव्हिजनल रिफंड देण्याची सोय कलम ५४ मध्ये करण्यात आली आहे. यामुळे भांडवल लवकर मोकळे होईल आणि व्यापारवृद्धीला चालना मिळेल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com