
डॉ. दिलीप सातभाई
प्राप्तिकर कायद्याच्या कलम १९४ सीमध्ये नुकत्याच झालेल्या उद्गम करकपात अर्थात ‘टीडीएस’च्या सुधारीत तरतुदी लागू करताना त्याच्या अंमलबजावणीत स्पष्टता आणि अचूकता आणण्याच्या दिशेने केंद्र सरकारने एक स्वागतार्ह पाऊल टाकले आहे. कलम १९४ सीमधील करकपात करण्यात अडथळा ठरलेल्या कलम १९४ जे (१) मध्ये उल्लेखलेली कोणतीही रक्कम ‘वर्क्स’च्या व्याख्येमधून वगळण्यासाठी बदल करण्यात आला आहे.