

What are Thematic Funds and How Do They Wor
sakal
सार्थक परदेशी (मनी लान्सर इन्व्हेस्टमेंट प्रा. लि. )
म्युच्युअल फंड
शेअर बाजार नैसर्गिकरित्या तेजी, स्थिरता आणि घसरण अशा चक्रांमधून जातात. प्रत्येक टप्प्यात काही विशिष्ट थीमशी निगडित क्षेत्रे आणि शेअर उत्कृष्ट कामगिरी करतात, तर काही मागे राहतात. उदा. सप्टेंबर २०२४ ते मार्च २०२५ दरम्यानच्या घसरणीत बँका आणि वित्तीय क्षेत्रांनी मजबूत परतावा दिला. यामुळे योग्य थीम ओळखणे दीर्घकालीन गुंतवणुकीच्या यशासाठी फायदेशीर ठरते; पण हे सातत्याने करणे आव्हानात्मक असते.