
Thematic Funds: Exploring New Investment Opportunities
Sakal
संतोष कांकरिया - संचालक, कांकरिया एजन्सीज प्रा. लि.
इक्विटी गुंतवणुकीबद्दल विचार केला जातो, तेव्हा सहसा स्थिर रोख प्रवाह, व्यवस्थापनाचा उच्च दर्जा आणि विश्वासार्ह ब्रँड निश्चित करण्यावर भर दिला जातो. हे मूलत: खालपासून वरपर्यंत (बॉटम-अप) संशोधन असते; पण गुंतवणूक ही बॉटम-अप संशोधनाची असते; तेवढीच ती वरपासून खालपर्यंत (टॉप-डाउन) विश्लेषणाचीही असते. टॉप-डाउन संशोधनात व्यापक आर्थिक आणि बाजारपेठेच्या परिस्थितीचा विचार करण्यात येतो. जीडीपी वाढ, व्याजदराचे चक्र, महागाई, विनिमय दर, जागतिक वाढीचे वातावरण आणि धोरणाची दिशा यांसारखे व्यापक प्रवाह (मॅक्रो ट्रेंड) समजून घेतल्यास गुंतवणूकदारांना कोणती क्षेत्रे चांगली कामगिरी करण्याची शक्यता आहे आणि कोणत्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो, हे ओळखण्यास मदत होते. उदा. उच्च व्याजदर सामान्यतः: बँकांसाठी चांगले असतात.