

Ratan Tata: A Life Thomas Mathew Book
esakal
सुधीर सेवेकर - seveker.sr@gmail.com
दिवंगत ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा यांच्याविषयी प्रकाशित झालेल्या साहित्यामध्ये सर्वाधिक विस्तृत, सविस्तर आणि पृष्ठसंख्येच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण
असे जीवनचरित्र म्हणजे लेखक थॉमस मॅथ्यू यांचा ‘रतन टाटा : अ लाइफ (Ratan Tata : A Life) हा इंग्रजी ग्रंथ होय. या पुस्तकाचा हा अल्प परिचय...
टाटा म्हणजे विश्वास (ट्र्स्ट) हे समीकरण भारतीयांच्या मनात दृढ केलेल्या टाटा समूहाची ही विश्वासार्हता पुढे नेली ती रतन टाटा यांनी. त्यांच्या कारकिर्दीचा वेध घेणारा थॉमस मॅथ्यू लिखित ‘रतन टाटा : अ लाइफ’ हा ७०० पृष्ठांचा ग्रंथ असून, त्यामध्ये शंभरच्या आसपास कृष्णधवल व रंगीत छायाचित्रांचा समावेश आहे. या पुस्तकाच्या लेखनासाठी लेखकाने रतन टाटा यांच्यासह जवळपास दोन-तीनशे देशी व परदेशी व्यक्तींच्या भेटी घेतल्या, त्यांच्याशी सखोल चर्चा केली. यावरून लेखकाने घेतलेल्या परिश्रमांची स्पष्ट कल्पना येते. लेखक थॉमस मॅथ्यू यांनी नवी दिल्लीतील संरक्षण मंत्रालय, अर्थ मंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालय अशा अनेक महत्त्वाच्या मंत्रालयांमध्ये वरिष्ठ आयएएस अधिकारी म्हणून दीर्घकाळ सेवा बजावली आहे. त्यांचे चिरंजीव जॉर्ज थॉमस हेही भारतीय परराष्ट्र सेवेत कार्यरत आहेत.