टिना रबर अँड इन्फ्रास्ट्रक्चर

टिना रबर ही भारतातील अग्रगण्य टायर रिसायकलिंग कंपनी असून, ती पर्यावरण पूरक तंत्रज्ञान आणि वित्तीय कामगिरीच्या जोरावर जागतिक स्तरावर विस्तार करत आहे.
"Tinna Rubber: From Waste Tyres to Profitable Recycling"

"Tinna Rubber: From Waste Tyres to Profitable Recycling"

Sakal

Updated on

भूषण ओक- शेअर बाजार विश्‍लेषक

टिना रबर अँड इन्फ्रास्ट्रक्चर ही दिल्लीस्थित कंपनी मार्च १९८७ मध्ये एक सूचीबद्ध सार्वजनिक मर्यादित कंपनी म्हणून स्थापन झाली. ही कंपनी वापराचा कालावधी संपलेल्या आणि खराब टायरपासून क्रंब रबर भुकटीचे उत्पादन करते. या भुकटीपासून पुढे क्रंब रबर मॉडिफायर, मायक्रोनाइज्ड रबर पावडर, हाय टेन्साइल अल्ट्राफाइन रिक्लेम रबर, अल्ट्राफाइन क्रंब रबर कंपाऊंड, पॉलिमर मॉडिफायड बिटुमेन, बिटुमेन इमल्शन, हाय कार्बन स्टील अ‍ॅब्रेसिव्ह, पॉलिमर कंपोझिट्स, थर्मो प्लॅस्टिक इलास्टोमर इत्यादी अनेक उत्पादने बनवली जातात, जी मुख्यतः वाहन आणि बांधकाम उद्योगांमध्ये वापरली जातात. एमआरएफ, जेके, सीएट, अपोलो यांच्यासारख्या टायर कंपन्या; तसेच इंडियन ऑइल, महिंद्रा यांसारख्या कंपन्यांना ही कंपनी माल पुरवते. कंपनी टाकाऊ गोष्टींपासून पुनर्पयोगी वस्तू बनवते आणि पर्यावरण संवर्धनाला मदत करते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com