
बी.एम.रोकडे
bmrokade@hotmail.com
मुंबईतील टोरेस कंपनीने अवास्तव परताव्याचे आमिष दाखवून अनेक लोकांना कोट्यवधी रुपयाला गंडा घातल्याचे प्रकरण नुकतेच उघडकीस आले.
टोरेस कंपनीच्या फसव्या योजनेत आतापर्यंत सव्वा लाख गुंतवणूकदारांनी १००० कोटी रुपयापर्यंत गुंतवणूक केल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. ‘अति घाई संकटात नेई’ ही उक्ती आपल्याला माहीत असते, तरीही त्याकडे दुर्लक्ष केले जाते आणि त्याचे घातक परिणामही अनेकदा दिसून येतात. आर्थिक बाबतीतही ‘अति हाव’ धोकादायक ठरल्याची अनेक उदाहरणे आपण पाहातो. पण यातून आपण ‘शहाणे’ कधी होणार?