

Triveni Turbines’ renewable energy expansion highlights CO2 storage systems and steam turbine leadership in India.
sakal
भूषण ओक (शेअर बाजार अभ्यासक-विश्लेषक)
शेअर बाजार
(शुक्रवारचा बंद भाव : रु. ५४४)
बंगळूर येथे मुख्यालय असलेली त्रिवेणी टर्बाइन्स ही ऊर्जा क्षेत्रातील एक जुनी कंपनी असून, तिचे आता नवीकरणीय ऊर्जानिर्मितीच्या क्षेत्रावर जास्त लक्ष आहे. कंपनीच्या एकूण महसुलात या क्षेत्राचा वाटा सुमारे ४० टक्के आहे. कंपनी मुख्यतः १०० मेगावॉटपर्यंत क्षमतेची स्टीम टर्बाइन बनवते; पण आता कंपनी सौर ऊर्जा, बायोमास ऊर्जा, वेस्ट हीट रिकव्हरी, जिओ थर्मल ऊर्जेबरोबर कार्बन डाय ऑक्साइड आधारित ऊर्जा संचय प्रणाली आणि त्यातून विद्युत ऊर्जा निर्मिती अशा प्रणालीसुद्धा बनवते. कंपनीची टर्बाइन खते, औषधी, पेट्रोकेमिकल, रिफायनरी अशा सर्व उद्योगांमध्ये वापरली जातात.