
अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचे निकाल हाती आले, अत्यंत अटीतटीचा सामना असावा आणि एखाद्या संघाने तो सहज जिंकावा तसे झाले. डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या ४७ व्या राष्ट्राध्यक्षपदी सहज विराजमान होणार हे निश्चित झाले आहे.
आपल्या शेअर बाजाराने देखील या घटनेला ९०० अंशांच्या तेजीची सलामी दिली, लगेच दुसऱ्याच दिवशी ‘मला काय त्याचे’ म्हणत बाजार ८३१ अंश खाली आला. पूर्ण तेजीचा ‘माहोल’ असताना, शेअर बाजार अधूनमधून पाच-दहा टक्के खाली येतोच; पण आता पुढे काय?