
दीपक घैसास
deepak.ghaisas@gencoval.com
लोकशाही असलेल्या सर्वच देशांत निवडणुकीच्या काळात राजकीय नेत्यांनी केलेल्या घोषणा कोणी जास्त गांभीर्याने घेत नाही. भारतात तर आपल्या सर्वसामान्यांना याची जाण आहे. अमेरिकेसारख्या महाबलवान देशाच्या अध्यक्षाने निवडणुकीदरम्यान केलेल्या घोषणाही जगाने तितक्याच गांभीर्याने घेतल्या होत्या.
परंतु, डोनाल्ड ट्रम्प जेव्हा निवडून आले, तेव्हा अध्यक्ष म्हणून त्यांनी आधी केलेल्या घोषणांचा धडाक्याने पाठपुरावा करायला सुरुवात केली, तेव्हा जग खडबडून जागे झाले.
त्यांनी नुकत्याच जाहीर केलेल्या आयातशुल्काच्या भेदक अस्त्रामुळे जगाच्या अर्थकारणावर, राजकारणावर, भूगोलावर मोठाच परिणाम होणार आहे. त्या अनुषंगाने अर्थकारणाच्या दृष्टिकोनातून जगभरात काय उलथापालथ होईल, याचा हा ऊहापोह.